HOME|mr|aartya|bhupali|
भूपाळी घनश्याम श्रीधराची घनश्याम सुंदरा श्रीधरा अर भूपाळी श्रीकृष्णाची ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकड
भूपाळी मारुतीची - उठा प्रातःकाळ झाला । मारु...


देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.
Poems that can be sung early morning while remembering God.



0GOOG
भूपाळी मारुतीची
उठा प्रातःकाळ झाला । मारुतीला पाहुं चला ।
ज्याचा प्रताप आगळा । विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥
आमुचा हनुमंत साह्यकरी । तेथें विघ्न काय करी ।
दॄढ धरा हो अंतरीं । तो त्वरीत पावेल ॥ १ ॥
आमुचा निर्वाणींचा गडी । तोचि पावेल सांकडीं ।
त्याचे भजनाचे आवडी । दॄढ बुध्दि धरावी ॥ २ ॥
थोर महीमा जयाची । कीर्ति वर्णवी तयाची ।
रामी रामदासाची । निकत भक्ति करवी ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A

Created by TransLiteral /Courtsey {Khapre.org} on 2008-02-22T23:02:49.3782112-05:00

Comments | अभिप्राय