HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी शंकराची धवळे भोळे चक्रवर्ती । धवळ भूपाळी नद्यांची प्रातःकाळीं प्रातःस्नान ।
भूपाळी गंगेची - उठोनियां प्रातःकाळीं । वद...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



19GOOG
भूपाळी गंगेची

उठोनियां प्रातःकाळीं । वदनीं वदा चंद्रमौळी ।

श्रीबिंदुमाधवाजवळीं । स्नान करा गंगेचें । स्नान करा गोदेचें ॥ध्रु०॥

स्नानदान जया अंतरीं । घडेल भागीरथीच्या तीरीं ।

हरि कृपा करिल त्यावरी । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ (गोदेचें) ॥१॥

भागिरथीचें स्नान करा । हृदयीं स्मरा गंगाधरा ।

चुकेल चौर्‍यांशींचा फेरा । ऐसें महात्म्य गंगेचें ॥२॥

गंगा आहे स्वर्गावरतीं । पाताळीं ते भोगावती ।

मृत्युलोकीं हे विख्याती । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥३॥

कृष्णावेण्या तुंगभद्रा । शरयू कालिंदी नर्मदा ।

भीमा भामा मुख्य गोदा । करा स्नान गंगेचें ॥४॥

व्यास वाल्मीकि नारदमुनि । अत्रि वसिष्ठ आणि जैमिनी ।

गुरुदत्त येति माध्यान्हीं । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥५॥

आली आषाढी एकादशी । चला जाऊं पंढरिसी ।

पांडुरंगाच्या चरणापाशीं । दावी माहात्म्य गंगेचें ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:40:55.1335504-04:00

Comments | अभिप्राय