HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी श्रीदत्तात्रेयाची उठिं उठिं बा दत्तात्रेया भूपाळी श्रीदत्तप्रभूची उठीं उठी श्रीदत्तात्रेया
भूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठी उठी बा मुनिनंदना । भक...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



19GOOG
भूपाळी श्रीदत्तप्रभूची

उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।

त्यांची पुरवी तूं कामना । पाही नयन उघडूनी ॥ध्रु०॥

उघडुनियां करुणादृष्टी । दासां धरी आपुलें पोटीं ।

नको येऊं देऊं हिंपुटी । घाली कंठीं मिठी हर्षें ॥१॥

हर्षे तुझे पदीं रंगले । दारागारा विसरले ।

निजदेहा न भुलले । विनटले निजभावें ॥२॥

निजभावें येतां शरण । लपविसी कां बा चरण ?

जेणें तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचें ? ॥३॥

नको करुं निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन ।

तूं अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥४॥

उठीं उठीं बा सद्‌गुरुराया । उठी उठी करुणालया ।

उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरीं ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:53:05.6039152-04:00

Comments | अभिप्राय