HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी श्रीदत्तप्रभूची उठीं उठी श्रीदत्तात्रेया भूपाळी श्रीदत्तप्रभूची उठी सत्त्वर प्रभुवरा यतिव
भूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठीं उठीं बा आत्मया । चिन...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



19GOOG
भूपाळी श्रीदत्तप्रभूची

उठीं उठीं बा आत्मया । चिन्मया दत्तात्रेया ।

सोडुनिया गुणमय शय्या । जागृत हो अपसैय्या ॥ध्रु०॥

झाली बा प्रबोध पहांट विवेक हा अरुण ।

आला उजळित आशा आतां उगवे चित्किरण ॥१॥

फिक्कट पडला व्यवहारेंदु वैरि निशाचर ।

कामादि हे लपले पाहुनि प्रकाश हा थोर ॥२॥

दुस्तर्कादिक दिवाभीत दडले ते ह्या वेळीं ।

दुर्वृत्ती ह्या तारा गगनीं मावळल्या सकाळीं ॥३॥

शमादि विप्र पुढें सादर राहति सांडुनिया दर ।

उठी उठी बा तूं निजरुपा दावीं ह्या सादर ॥४॥

रागद्वेष मलोत्सर्गा करुनि आला पुढती ।

वासुदेवा भेट दे हा करिताहे प्रणती ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:54:17.5473648-04:00

Comments | अभिप्राय