HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्त आरती संग्रह दत्त आरती विधिहरिहर सुंदर दिगंबर झा
दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द...


Datta Arati - Prayer to Lord Datta

19GOOG
दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
N/A
Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-12-24T02:10:59.2277200Z

Comments | अभिप्राय