HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
देवीची आरती यर्हि न सन्नासदपि स् देवीची आरती चतुराननभयहारिणि भो द
देवीची आरती - निर्गुणधामी निर्विकल...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.


19GOOG
देवीची आरती
निर्गुणधामी निर्विकल्पीं निरालंबीं ही ।
अद्वयरूपा सद्वयमिळणी मग्न निरामयी ॥
भागलां देवा अनंत प्रपंच्याठायी ।
श्रमपरिहरणीं घ्यावी आतां विश्रांती शुभ ही ॥ १ ॥
शेजारति ओंवाळूं उन्मीनी ध्याने महामाया ।
निरंजन मंदिरी पहुडे रचिली सुखशय्या ॥ धृ ॥
असतां उगाचि नसतां कारण द्वैता पावूनियां ।
होउनि अतिकारण ती विश्वे बहु घडमोडुनियां ॥
एक तुं अनेक झाला असतां परता राहुनियां ।
भोगविसा कृतकर्मे वर्मे जीवन मानवुनियां ॥ शेजारति. ॥ २ ॥
ऎसी तूं महामाया वेषाजन हें मोहुनियां । 
सुखदु:खादिक हर्षविषादाखेदा लावुनियां ॥
होसी पाहसा कौतुक दाविसी पुस्त्री भावनियां ।
काय हि लीला परतंत्र जन कष्टा घालुनियां ॥ शेजा. ॥ ३ ॥
पुरेआतां तव आवरुनि माया ज्ञाना देऊनियां ।
पुरविं मनोरथ देवा आपुल्या विरुदा राखूनियां ॥
सेव्यसेवक भाव रितीनें वांच्छित देऊनिया चालवी ।
दास अविघ्नें नातरि देवा देई लया ॥ शेजा. ॥ ४ ॥
अनंत ब्रह्मांडे तव शय्येठायिं बीजरूपीं ।
होती लीन न उरतां कांहीं सर्वही तव रूपीं ॥
रूपा रूप मिळोनि अरूपी निजसी स्वरूपीं ।
मंगीशात्मज विनवी विव्हळ काळी साक्षेपी ॥शेजा. ॥ ५ ॥
Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-14T18:56:30.0000000Z

Comments | अभिप्राय