HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
देवीची आरती चतुराननभयहारिणि भो द देवीची आरती ओंवाळू आरती । महामाय
देवीची आरती - कवण अपराधास्तव जननी ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.


19GOOG
देवीची आरती

कवण अपराधास्तव जननी केला तूं रुसवा ।
मी तो ध्यातो ह्रदयी तुजला अहर्निश भावा ॥ १ ॥
जय जय दीनदयाळे शांते देई मज भेटी ।
तव चरणाची स्वामिणी मजला आवडी मोठी ॥ धृ. ॥
चिंताकूपी पडलो कोण काढिल बाहेरी ।
धांवे पावे झडकरि अंबे करुणा तूं करी ॥ जय. ॥ २ ॥
माता पिता गुरु दैवत सर्वही तूंची ।
तुझ्यावांचुनि देवी मजला कोणी नलगेची ॥ जय. ॥ ३ ॥
काय असे पाहूनी अंगीकार त्वां केला ।
आतां करणे त्याग तरि हें अघटित ब्रीदाला ॥ जय. ॥ ४ ॥
वेद शास्त्रें आणि पुराणें गर्जति अपार ।
नाम घेता हरती किल्मिष पुरवीं अंतर ॥ जय. ॥ ५ ॥
दास शरण हा अनन्यभावें करितो विनंती ।
तुज वांचोनी मजला न गमे निश्चय दे सुमती ॥ जय. ॥ ६ ॥
Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-14T18:59:17.0000000Z

Comments | अभिप्राय