HOME|mr|aartya|devi|
देवीची आरती आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस हरतालिकेची आरती  जय देवी हरितालिके। सखी पा
देवीची आरती - जय देवी श्रीदेवी माते । व...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.


0GOOG
देवीची आरती
जय देवी श्रीदेवी माते । वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥
श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी । पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥
जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती । शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥
भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती । आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥
गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती  मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती ॥ २ ॥
जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती । अनन्य भावे तुजला स्मरुनी प्रार्थीती ॥
त्यांच्या हाकेला तूं धांवुनिया येसी । संतती, वैभव किर्ती धनदौलत देसी ॥ ३ ॥
विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावे । भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ॥
मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी । म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A

Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-14T17:30:11.0000000Z

Comments | अभिप्राय