HOME|mr|aartya|devi|
देवीची आरती जय जय दीनदयाळे शांते देवीची आरती ओंवाळूं ओंवाळूं आरती
देवीची आरती - जय देवी जय देवी जय आ...


देवीची आरती

0GOOG
देवीची आरती

जय देवी जय देवी जय आदिशक्ती ।
ओंवाळूं आरती तुज हो भगवती ॥ धृ. ॥
मूळमायारुप तुझे न कळें कवणासी ।
ब्रह्मादिक सुरवर ध्याती मानसी ॥
व्यापुनियां जग सर्व खेळा खेळसी ।
वधुनी शुंभनिशूंभा देवा वर देसी ॥ जय. ॥ १ ॥
दृष्टी व्यंकट पाहतां कांपे त्रिभुवन ।
मुख पसरुनियां ग्रासिसी दैत्यालागून ॥
दशभूजाआयुधें लखलखती जाण ॥
मर्दियेला महिषासूर चरणीं घालून ॥ जय. ॥ २ ॥
पवाडे वर्णितां खुंटली मम वाणी ।
विश्व त्वां मोहियले लावीले ध्यानीं ॥
माया तूं माउली जगताची जननी ।
विनवुनियां गोविंद ध्यान असे मनी ॥ जय. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
0GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:28:42.2742768Z

Comments | अभिप्राय