HOME|mr|aartya|guru|
गुरूची आरती स्वानुभवें भवतारक जय सद्‌ गुरूची आरती जय देव गुरुराया । ब्रह्
गुरूची आरती - शांतिकल्याण सहजानंद आरती ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



0GOOG
गुरूची आरती

शांतिकल्याण सहजानंद आरती , सहजानंद आरती ।

अखंड ओंवाळूं कृष्णा कैवल्यपती ॥ १ ॥

आरत रे माझ्या प्राणवल्लभा, माझ्या प्राणवल्लभा ॥

जिकडे पहावा तिकडे अवघा सद्‌गुरू ऊभा ॥ धृ. ॥

अलक्ष्यांचें लक्ष्य, तेथें कैचें लक्षण ।

सद्‌गुरुची आरती न कळे जन ॥ २ ॥

नित्य हरिकथा नित्यानंददिपवाळी ।

नित्य गणेशदास नीरांजन ओंवाळी ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T02:00:11.6732400-04:00

Comments | अभिप्राय