HOME|mr|aartya|kakad|
विठ्ठलाची कांकडआरती भक्‍तीचिंये पोटीं बोध का कांकडआरती रामाची कांकड आरती परमात्मया रघु
विठ्ठलाची कांकडआरती - उठा पांडुरंगा आतां दर्शन ...


विठ्ठलाची कांकडआरती

0GOOG
विठ्ठलाची कांकडआरती

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।

झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥

संत साधु मुनि अवधे झालेती गोळा ।

सोडा शेजमुख आतां पाहूं द्या मुखकमळा ॥२॥

रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी ।

मन उतावेळ रुप पाहावया दृष्टीं ॥३॥

राई रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।

सेजें हालवुनी जागें करा देवराया ॥४॥

गरुड हनुमंत उभे पाहाती वाट ।

स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥

झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T02:14:59.1326768-04:00

Comments | अभिप्राय