HOME|mr|aartya|kakad|
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची कांकडआरती श्रीदत्तप्रभूची काकडे आरती दत्ता तुजला ओव
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची - काकड आरती स्वामी श्रीगुरु...


कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

0GOOG
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

काकड आरती स्वामी श्रीगुरुदत्ता ।

सद‌भावें ओवाळूं चिन्मयरुप अवधूता ॥ध्रु०॥

प्राणापान समान व्यान उदान मिलाले ।

सुषुम्णेचे मार्गें दर्शनासि पातले ॥१॥

सोऽहं शब्दध्वनि मिळोनि सर्वांनी केला ।

दशनादाचा घोष अखंडित चालिला ॥२॥

कुंडलिनीचा वेढा काढुनि काकडा केला ।

सत्रावीचें धृत घेउनी पूर्ण भिजवीला ॥३॥

सद्‌गुरु वाक्याचा चिन्मय प्रकाश पडला ।

निश्चय काकडा नेऊनि तेथें पेटविला ॥४॥

निरंजन ओवाळूं जातां तद्रूप झाला ।

सद्‌गुरुप्रसादें अहंभाव निमाला ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T02:21:15.1333392-04:00

Comments | अभिप्राय