HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|कांकडआरती|
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची काकड आरती स्वामी श्रीगुरु
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची - काकडे आरती दत्ता तुजला ओव...


कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

19GOOG
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

काकडे आरती दत्ता तुजला ओवाळूं ।

प्रेमभावें तुझे चरण हृदयीं कवळूं ॥ध्रु०॥

माया अविद्या एकत्र वळुनी काकडा केला ।

स्वरुपानुस्मरणें स्नेहामाजी भिजवीला ॥१॥

विवेकज्ञानाग्नि ज्वाळेवरि सहसा पाजळिला ।

पेटुनियां झगझगीत उजेड हा पडला ॥२॥

द्वैत ध्वांता समूळ ग्रासुनि मनोन्मनी शोभा ।

फांकली तेव्हां पळत सुटे कामादिक शलभा ॥३॥

धावुनि आपोआप येती कामादिक शलभ ।

जळती ज्यांचा अंत योगियां दुर्लभ ॥४॥

काकडे आरती ऐशी उजलूं सोज्वळ ।

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T02:23:29.7168608-04:00

Comments | अभिप्राय