HOME|mr|aartya|khandoba|
खंडोबा आरती संग्रह खंडोबाची आरती जय देवा खंडेराया । निजशिव
खंडोबाची आरती - पंचानन हयवाहन सुरभूषितनीळ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



0GOOG
खंडोबाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।

खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥

मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।

हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।

वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥

सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।

नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥

अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।

फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।

तो हा मल्लांतक अवतार झाला ॥

यालागीं आवडे भाव वर्णीला ।

रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:49:51.1309440-04:00

Comments | अभिप्राय