HOME|mr|aartya|krishna|
श्रीकृष्णाची आरती वृंदारकगुणवृंदं परमामृतकं श्रीकृष्णाची आरती बंधु बलरामासह गोकुळीं अवत
श्रीकृष्णाची आरती - निरसुनि देहत्रय अंतरमंदिर...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



0GOOG
श्रीकृष्णाची आरती

निरसुनि देहत्रय अंतरमंदिरीं ।

महाकारण तेजतुर्या ओंवाळीं ॥

अर्ध मात्रासहित करोनि कूसरी ।

महाराजया तूं सुखनिद्रा करी ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

गोपीरमणातूतें करूं शेजारती ॥ धृ. ॥

पुंनाग मोगरे आणिक जुई जाई ।

बकूळ पारिजातक चंपक शेवंती ॥

परिमळद्रव्यें सहित या सुमनावतीं ।

त्यावरि निद्रा करि तूं भुवनत्रयपती । जय देव. ॥ २ ॥

या शेजेवरि निद्रा करि देवदेवा ।

लक्ष्मी करित आहे चरणांची सेवा ॥

सत्यभामा विंझाणा वारितसे बरवा ।

माधवदासास्वामी अभय कर द्यावा ॥ जय देव. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T00:53:00.8899440-04:00

Comments | अभिप्राय