HOME|mr|aartya|maruti|
मारुती आरती संग्रह मारुतीच्या आरत्या माया शोधाविषयीं तरलासि सम
मारुतीची आरती - सत्राणें उड्डाणें हुंकार ...


Hanuman Arati - Prayer to Lord Hanuman



0GOOG
मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥

जय देव जय देव जय हनुमंता । तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
N/A
Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:49:39.9527296Z

Comments | अभिप्राय