HOME|mr|aartya|maruti|
मारुतीच्या आरत्या अघटित भीमपराक्रम जय जय हन मारुतीच्या आरत्या कोटीच्या ही कोटी गगनीं उड
मारुतीच्या आरत्या - जय देवा हनुमंता । जय अंजन...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



0GOOG
मारुतीच्या आरत्या

जय देवा हनुमंता । जय अंजनी सुता ॥

ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥

आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ धृ. ॥

वानररुपधारी । ज्याची अंजनी माता ॥

हिंडती वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ।

धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिलीं कथा ॥ १ ॥

सीतेच्या शोधासाठीं । रामें दिधली आज्ञा ॥

उल्लंघुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ।

शोधूनी अशोकवना। मुद्रा टाकिलि खुणा ॥ २ ॥

सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥

वन हे विध्वंसिलें । मारिला अखया दारूण ॥

परतोनी लंकेदरी । तंव केले दहन ॥ ३ ॥

निजवळें इंद्रजित । होम करीं आपण ॥

तोही त्वां विध्वंसिला लघुशंका करून ।

देखोनी पळताती ॥ महाभूतें दारूण ॥ ४ ॥

राम हो लक्षुमण । जरी पाताळीं नेले ॥

तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेशे केले ॥

अहिरावण महिरावण । क्षणामाजीं मर्दिले ॥ ५ ॥

देउनि भुभु:कार । नरलोक आटीले ॥

दीनानाथा माहेरा त्वां ॥ स्वामिसी सोडविले ॥

घेऊनि स्वामी खांदी । अयोध्येसी आणिलें ॥ ६ ॥

हनुमंत नाम तुझें । किती वर्णू दातारा ॥

अससी सर्वठायी । हारोहारीं अंबरा ॥

एका जनार्दनीं ॥ मुक्त झाले संसारा ॥ ७ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:03:01.6669104-04:00

Comments | अभिप्राय