HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|मारुती आरती संग्रह|
मारुतीच्या आरत्या कोटीच्या ही कोटी गगनीं उड मारुतीच्या आरत्या जय जय अंजनिबाला । पंचारत
मारुतीच्या आरत्या - सत्राणें उड्डाणें हुंका...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



19GOOG
मारुतीच्या आरत्या

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।

करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥

गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।

सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥

जय देव जय देव जय हनुमंता ।

तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।

थरथरला धरणीधर मानीला खेद ॥

कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद ।

रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:08:12.4437856-04:00

Comments | अभिप्राय