HOME|mr|aartya|pandurang|
पांडुरंगाची आरती येई हो विठ्ठले माझे माऊली पांडुरंगाची आरती जय जय कटिकर विठ्ठल चिन्मय
पांडुरंगाची आरती - विठ्ठला मायबापा । वारीं ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


0GOOG
पांडुरंगाची आरती ३

विठ्ठला मायबापा ।
वारीं त्रिविधतापा ।
संसारी त्रासलो मी ॥
वय लागलें मापा ॥ धृ. ॥

बाळपणीं नाठविले ॥
व्यर्थ तारुण्य गेलें ॥
जरा हे दु:ख मोठे ॥
पुढे ठाकुनि आले  ॥ विठ्ठला. ॥ १ ॥

भक्तीचा लेश कांही ॥
सत्यमागम नाही ॥
परिणामीं काय आतां ॥
शरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ ॥

हरी हरी माझी भ्रांती ॥
म्हणुनी आलो काकूळती ॥
कृपाळुबा जगन्नाथा ॥
तारी गंगाधरसूता ॥ विठ्ठला ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T19:21:24.0000000Z

Comments | अभिप्राय