HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
पांडुरंगाची आरती आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर पांडुरंगाची आरती जगदीश जगदीश देव तुज म्हणत
पांडुरंगाची आरती - धन्य दिवस अजि दर्शन संतां...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


19GOOG
पांडुरंगाची आरती ६

धन्य दिवस अजि दर्शन संतांचे, दर्शन संतांचे ॥
नांदे तया घरी दैवत पंढरीचें ॥ धृ. ॥

धन्य पुण्यरूप कैसा झाला संसारू, कैसा झाला संसारू ॥
देव आणि भक्त दुजा नाही विचारू ॥ १ ॥

धन्य पूर्वरूप ओढवले निरुतें, पुण्य ओढवले निरुतें ॥
संतांचे दर्शन झालें भाग्यें बहुतें ॥ २ ॥

तुका म्हणे धन्य आम्हां जोडिला जोडी, आम्हां जोडिला जोडी ॥
संतांचे चरण आतां जीवे न सोडीं ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T21:07:52.0000000Z

Comments | अभिप्राय