HOME|mr|aartya|rama|
रामचंद्राचीं आरती स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे रामचंद्राचीं आरती श्यामसुंदर रामाचे चरणकमळी
रामचंद्राचीं आरती - काय करुं गे माय आतां कवणा...


रामचंद्राचीं आरती

0GOOG
रामचंद्राचीं आरती

काय करुं गे माय आतां कवणा ओंवाळूं ॥
जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळूं ॥ धृ. ॥
ओंवाळूं गे माये निजमूर्ति रामा ॥
रामरुपी दुजेपणा न दिसे आम्हां ॥ १ ॥
सुरवर नर वानर अवघा राम सकल ॥
दैत्य निशाचर तेही राम केवळ ॥ २ ॥
त्रैलोक्यस्वरुपें राम संचारला एक ॥
सद‍गुरुकृपे केशवराजी आनंद देख ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
0GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:08:25.9718656Z

Comments | अभिप्राय