HOME|mr|aartya|tulsi|
तुळशी आरती संग्रह तुळशीची आरती जय देवी तुळसी माते बहु पु
तुळशीची आरती - तुळसीमळमृत्तिका जो लावी भ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



0GOOG
तुळशीची आरती

तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।

अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥

तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।

त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय मये तुळसी ।

अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥

मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा ।

पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥

आले यमकिंकर म्हणती रविकुमरा ।

तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय. ॥ २ ॥

तुझिया एका दळे सोडविले देव ।

म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥

वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव ।

मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्‌भाव ॥ जय. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T03:20:41.1877408-04:00

Comments | अभिप्राय